Wednesday, August 15, 2012

majadesh


माझा देश

देश झाला सिनीयर सिटिजन

भ्रष्ट्राचार आहे मोठे विझन.

ईकडे तिकडे घोटाळेच घोटाळे

६५ वर्षात झाले वाटोळे.

जाती पातीचे करुण कोंडाळे

जनतेचे,कसे केले वाटोळे

जनतेचा बघा पैसा चोराला

विदेशी बंकेत जाऊन भरला.

देशाचे हे पांढरे चोर

लोकसभेत नाचतात जसे मोर

जागा हो भारत वासी

लाउया या चोराना फाशी

सुभाष थोरात १४/०८/१२
 ·  ·  · 15 hou

shunya navacha manus

शुन्य नावाचा मानुस

तो आहे तसाच आहे. त्याची फकत ऐकच बडबड. मी शुन्य, मी शुन्य आणि फकत शुन्य . मी आपला सकाळचा फेर फटका मारत होतो. त्याच्या या वकत्यावर मला आश्चर्य वाटत होते. का म्हणुन हा बडबडतो आहे. मी त्याच्या कडे गेलो व मनालो. काहो आपण असे का बडबडतात. आपणास नेमक म्हण्याचे काय आहे. का असे उदासीन प्रमाने बोलत आहात.

तो माझ्या कडे टक्क लावुन पाहु लागला. थोड्याशा विश्रांती नंतर मनाला बोला साहेब का म
्हणतात. माझ्या बोलण्यावर आपले काही आपेक्ष आहे का ? . मी स्वतत्र भारताचा स्वंतत्र नागरीक. का मला बोलण्याचा अधिकार नाही का. मी पण काही गप झालो. तस तो का बोलत होता. हा मला ही प्रश्न होताच. मि मला शुन्यजी चला आपण चहा घेऊ या. माझ्या विनतीला मान देउन तो हो मनाला. मग आम्ही जवळच असलेल्या चहा च्या टेल्या कडे वळालो.

खोके वजा टुल असलेल्या आसनावर आम्ही विराज मान झालो.

तसा तो सुशिक्षत वाटत होता. तो म्हणला बघा साहेब जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा पासुन माझ्या मागे विशेक्षण नावाची रेल गाडि सुरु झाली. आईचा वडीलाचा मुलगा, परिवारचा सदस्य व भावी पिढीवा वारस. वगैरे वगैरे ही रेल गाडी फारच मोटी आहे. जन्मा पासुन मरे पर्यत व मरण्या नंतर ही विशेक्षण माझा पिछा सोडणार नाही. म्हटल तर सार गाव मामाच एक नाही कामच. हि म्हण तर आपण ऐकली असणारच. त्याचे म्हणने तसे खरे होते. मी आपला त्याच्या हो मध्ये हो मनत होतो. माझ्या होकाराने तो खुलू लागला. साहेब आपणास वाटते की आपला गोतावळा खुप मोठा आहे. पण खरच सांगतो सारे काही शुन्य आहे. जर हे गोतावळे माझे असते तर मी आज मी शुन्य म्हणुन असा फिरलो नसतो. आई, बाप, भाउ, बहिण , मित्र नातेवाईक हे फक्त काळाचे सोबती. असाल मालदार तर आपण हिरेवे गार. नाहि तर काय शुन्यच. त्याचे हे संभाषण मला ही पटु लागले. मी ही थोडा विचार करु लागलो. हो हे खरच आहे. जर आपली काही ओऴख असते ती या विशेषणा मुळेच. हि सारी विशेषण गळुन पढली तर खरच आपण ही शुन्य आहोत.

शुन्य जी पण मला हे सांगा आपल्याला हे सुचल कस. तसे म्हटले तर आपण जे बोलत आहात त्यात काही चुक नाही. त्याच काय साहेब आले्या भोगाशी असावे सादर. अशी माझी अवस्था आहे. मी पण तुमच्या सारखा ऐक समाज प्रिय मानुस. सार काही होत. अजुन ही काही माझे आपले आहेत. पण मनातात बोलायची कडी आणि बोलायचा भात. मला हे सुचण्याच कारण म्हणजे, रदीत मिळालेला एका पेपरचा तुकडा त्यात असेलेली कविता. मी म्हणलो त्या कवीतेच आणि तुझा काय संबध. त्या कविते शुन्या विषय़ी काही होत का. हो साहेब त्या कवितेच्या नावातच सार काही होत. मी म्हणालो काय नाव होत त्या कवितेच. साहेब नाव अस काही होत. मी आहे तरी कोण हे त्या कवितेच नाव होत. मग ती कविता तुला येत असणार. साहेब तो कागद माझ्या जवळच असतो. आणि त्या कवितेच्याच ओळी मी मनत असतो. ती कविता माझ्या जिवनाशी ऐकरुप आहे. त्याने तो कागदाचा तुकडा माझ्या हातात दिला . मी तो उलगडुन पाहो लागलो. मी आहे तरी कोण या कवितेवरुन माझी नजर फिरु लागली व मला आंनदाने हसायला येउ लागले. माह्मे हसणे पाहुन शुन्यजी मनाले साहेब आपण ही सुन्य झालात का. मी जोरात असलो व म्हणालो हौ मी पण शुन्य , शुन्य आणि शुन्यच आहे. कारण ति कविता माझी होतीच. त्यात शेवटचे शब्द होते ते असे सार काही गेल तर मी आहे तरी कोण फक्त एक शुन्यच. एका शुन्यला माझी संगत लागली आणि दोघ शुन्य आपल्या आपल्या मार्गाने निघुन गेली.

सुभाष थोरात १४/०८/२०१२